Hot Posts

6/recent/ticker-posts

देवरी ; पोलीस प्रशासनाचा निश्चय, अन् 'डीजेमुक्ती' ची क्रांती

 


      तालुक्यात डीजेमुक्त मिरवणुकीने बाप्पाला निरोप...

देवरी,दि.19 ;

      'गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या' अशा गगनभेदी घोषणारुपी गर्जनेने तसेच डीजे मुक्तीच्या क्रांतिकारी पाऊलाने पारंपारिक वाद्याच्या तालावर नाचत-गाजत प्रचंड जल्लोषात गणेशभक्तांनी आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप दिला.  यावर्षीचे गणेश विसर्जन देवरी शहर व तालुक्यासाठी क्रांतिकारी पाऊल ठरले. पोलीस  प्रशासनाने अभियान म्हणून हाती घेतलेल्या डीजेमुक्तीचा प्रयोग कमालीचा यशस्वी ठरला. डीजेमुक्तीचा 'श्रीगणेशा' यानिमित्ताने अंमलात आला. पोलीस यंत्रण व शांतता समिती सदस्यांचं डीजेमुक्तीला मिळालेलं पाठबळ व गणेश मंडळांच्या समन्वयी भुमिकेचा अंमल क्रांतिकारी ठरला. याच क्रांतीतून देवरी शहरासर तालुक्यातील  सार्वजनिक गणरायांचे 'निर्विघ्न' विसर्जन झाले. 

पोलीस प्रशासनाचा निश्चय, अन् 'डीजेमुक्ती' ची क्रांती...

देवरी शहरात डीजे बंदी यशस्वी होईल का? याबाबत पूर्वइतिहास पाहता काही अंशी साशंकता होती. मात्र पोलीस प्रशासनाच्या निश्चयाला गणेश मंडळाचे पाठबळ मिळाल्याने क्रांती झाली.  पोलीस उपविभागीय अधिकारी विवेक पाटील व देवरी पोलिस्टेसनचे ठाणेदार प्रविण डांगे यानीं पारंपारीक गणेश विसर्जनासाठी अभियानाला पाठबळ दिले. गणेश मंडळानी शांतता बैठकीतच डीजेमुक्त अभियानास पाठिंबा दिला होता. देवरी  शहरात मिरवणुकीत डीजे लावणार नाही  अशे संकल्प शांतता बैठकीत ठेवन्यात आली होती. ज्यात देवरी शहरासह तालुक्यातील गणेश मंडळानीं डीजेमुक्त गणरायाचे विसर्जन शांतते व पारंपारीक पद्धतीने पार पाडन्यास गणेश मंडळानीं  सहकार्य केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या