Hot Posts

6/recent/ticker-posts

देवरी तालुक्याला मुसळधार पावसाने झोडपले:नदी-नाल्यांना पूर

 


देवरी, दि.10 ; 

          तालुक्यात  दोन दिवपासून संततधार होत असून, तालुक्यातील अनेक नदी-नाले ओसंडून वाहत आहे. विशेषता शिरपुर धरनाचे दरवाजे उघडन्यात आल्याने नागपुर - रायपुर या महामार्गावरील वाहतुक काही तास बंद पडी होती. त्यातच  देवरी तालुक्यातील बेलारगोंदि येथिल नाल्याला मोठा पूर आला आहे. यामुळे शहराला जोडनारा मार्ग बंद असुन या मार्गावरील वाहतूक बंद झाली आहे.  तसेच देवरी शहरातील मस्कर्या चौकातील रस्त्यालाही नाल्याचे स्वरूप आले आहे. तर तालुक्यातील अनेक ग्रामीन भागाचा शहरासी पुरामुळे संपर्क तुटला आहे. 



या ढगफुटी दृश्य झालेल्या पावसामुळे अनेकांचे मोठे नुकसान झाले आहे. ग्रामीन भागातील  पुलाची उंची कमी असल्यामुळे पाऊस पडला की अनेक  नाल्याला पूर येतो. यामुळे शाळेतील विद्यार्थ्यांना आणि शहरा कडे जाणाऱ्या वाहन धारकांना पूर कमी होण्याची वाट पाहत बसावी लागते. यामुळे या पुलाची उंची वाढविण्याची मागणी परिसरातील नागरिकांमधून होत आहे. या ढगफुटी दृश्य मुसळधार होत असलेल्या पावसामुळे अनेकांची तारांबळ उडाली असून, यामध्ये शेतीचेही मोठे नुकसान झाल्याची माहिती  आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या