Hot Posts

6/recent/ticker-posts

भाजपमध्ये विकासाच्या नावावर प्रवेश केला तेव्हा दुःख झालेल्या माझ्या सर्व काँग्रेसच्या नेत्यांसह कार्यकर्त्यांची क्षमा मागतो - माजी आमदार गोपालदास अग्रवाल



दोन्ही जिल्ह्यात काँग्रेसच्या विजयासाठी नानाभाऊच्या सोबतीला मी - गोपालदास अग्रवाल

गोंदिया,दि.14 ; 

      पाच वर्षापुर्वी मी जेव्हा भाजपमध्ये  विकासाच्या नावावर प्रवेश  केला तेव्हा दुःख झालेल्या माझ्या सर्व काँग्रेसच्या नेत्यांसह कार्यकर्त्यांची क्षमा मागतो असे म्हणत केलेली चूक सुधारत आज पुन्हा आपल्यासोबत काँग्रेसमध्ये पुन्हा येत असल्याचे गोपालदास अग्रवाल  म्हणाले . विकासाच्या मुद्यावर मी रस्ता भटकलो होतो, परंंतु मी आपली चूक सुधारत परत आपल्या घऱी आलो असे माजी आमदार गोपालदास अग्रवाल यांनी दि.१३ रोजी काँग्रेस पक्षाच्या जाहीर प्रवेश सोहळ्यात सांगितले. त्यातच येथील काही नेत्यांनी काम तर केले नाही पण स्वतःला विकासपुरूष सांगून अनेक कामात खोळंबाच निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याची टिका करीत भाजपमधील अनेकांनी निष्ठा न पाडता गद्दारांना साथ दिल्याची टिका केली.



पुढे बोलतांना अग्रवाल म्हणाले की, माझ्यापुर्वी नानाभाऊंनी काँग्रेस सोडली तेव्हा मी काँग्रेसला सांभाळलो,माझ्या गेल्यानंतर नानाभाऊंनी सांभाळली.आत्ता आम्ही दोघेही एकत्र आहोत,काँग्रेसला मजबूत करण्याकरीता एक करुन आय़ुष्याच्या शेवटपर्यंत मी काँग्रेसचे काम करीन अशी ग्वाही देतो.गोंंदिया विधानसभेची निवडणूक काँगेसनेच लढावी अशी सर्वांची इच्छा आहे,आणि आपण मला तशी ग्वाही दिली आहे.माझ्याचुकीमुळे २०१९ च्या निवडणुकीत काँग्रेस निवडणूक हरली असली तरी २०२४ च्या निवडणूकीत मोठ्या मताधिक्यांने काँग्रेस विजयी होईल याची ग्वाही देत असल्याचे अग्रवाल म्हणाले.या मंचावर उपस्थित असलेल्यापैकीच मुख्यमंत्री व मंत्री होणार असल्याने मला विकासाकरीता ते नक्कीच सहकार्य करणार आहेत. भाजपचे प्रभारी नरोत्तम मिश्रा यांनी या कार्यक्रमाला काँग्रेसच्या तेरवीचा कार्यक्रम असे संबोधले त्या मिश्रांनाच त्यांच्या मतदारसंघातील जनतेने पराभूत करुन त्यांची तेरवीच केल्याची टिका करीत भाजपने गोंदियात गद्दारांनाच साथ दिल्याचीही टिका केली. काँग्रेसने ७५ वर्षाच्या कार्यकाळात आमच्या गोंदिया भंडारा जिल्ह्यातील नेत्यांला महाराष्ट्राचे नेतृत्व दिले यावरुन काँग्रेस खरंच आजाद असल्याचे सांगत नानाभाऊ तुम्ही समोर वाढा आम्ही तुमच्या सोबत आहोत.तुमचा जन्म गोंंदियाचा आहे,तुम्ही नक्कीच गोंंदियाचा विकास कराल अशी अपेक्षा व्यक्त करीत महाराष्ट्राच्या मुख्य पदावर आपण बसावे अशी आशा व्यक्त केले.ज्याच्या खांद्यावर नानाभाऊ हात ठेवतो तो विजयाचाच शिल्पकार असतो असे खासदार प्रशांत पडोळे यांचे उदाहरण देत सांगितले.

मंचावर महाराष्ट्र प्रदेश काँगेस अध्यक्ष नाना पटोले,महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला,माजी मुख्यमंंत्री पृथ्वीराज चव्हाण, विरोधी पक्षनेते विजय वड्डेटीवार,माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण,माजी मंत्री नितिन राऊत,सुनिल केदार,सतिश चतुर्वेदी,आदिवासी नेते शिवाजीराव मोघे,खासदार प्रशांत पडोळे,खासदार नामदेवराव किरसान,खासदार श्याम बर्वे,आमदार सहसराम कोरेटे,आमदार अभिजित वंंजारी,माजी खासदार शिशुपाल पटले, वारासिवनीचे आमदार विवेक पटेल,परसवाडा आमदार मधु भगत,माजी आमदार हिना कावरे,काँग्रेस जिल्हाध्यक्ष दिलीप बनसोड,माजी आमदार गोपालदास अग्रवाल,माजी जि.प.अध्यक्ष एड.के.आर.शेंडे,महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस अध्यक्ष कुणाल राऊत,गोंंदिया प्रभारी नाना गावंडे,माजी आमदार कुणाल चौधऱी यांच्यासह अनेक मान्यवर मंचावर उपस्थित होते.

यावेळी गोंदिया जिल्हा हा कुण्या एका नेत्याचा नव्हता तर काँग्रेसचा व सर्वसामान्य काँग्रेस कार्यकर्त्याचा जिल्हा आहे.आता काँग्रेसपक्ष पुन्हा गोंदिया जिल्ह्यात गोपालदास अग्रवालांच्या प्रवेशाना पुन्हा बळकट झालेला आहे.आमचे नेते राहुल गांधी यांनी नेहमीच आरक्षणाच्या बाजूने भूमिका घेतली आहे.मात्र विरोधी पक्षाचे नेते चुकीचा अर्थ काढून आमच्या नेत्याविंषयी गैरसमज पसरविण्याचे काम करीत आहे.भाजपही आरक्षणाची विरोधक आहे,आजही ते जातीगत जनगणना करण्यास टाळाटाळ करते यावरुन सामान्य नागरिकांनी आजा सजग राहून संविधानाच्या रक्षणाकरीता संघटित राहिले पाहिजे असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले म्हणाले.गोंदिया भंडारा जिल्ह्यातील हजारो काँग्रेसजणांना या सोहळ्याला उपस्थित लावली होती.या पक्ष प्रवेश कार्यक्रमामुळे शहरातील वाहतूक व्यवस्थेवर परिणाम होऊन वाहतूक कोंडी झाली होती. 

कार्यक्रमात विरोधी पक्ष नेते विजय वड्डेटीवार,नितीन राऊत,सुनिल केदार,आमदार सहसराम कोरेटे,खासदार प्रशांत पडोळे,नामदेवराव किरसाना,श्याम बर्वे आदींनी विचार व्यक्त केले.गोंंदिया जिल्हा काँग्रेस अध्यक्ष दिलीप बनसोड यांनी स्वागत पर प्रास्तविक केले.संचालन अपुर्व अग्रवाल यांनी केले. राष्ट्रगितांने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या