Hot Posts

6/recent/ticker-posts

लोकशाही दिन 7 ऑक्टोंबर रोजी


गोंदिया, दि.20 ; 

        जिल्ह्यात सर्व सामान्य जनतेसाठी दर महिन्याच्या पहिल्या सोमवारी लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात येते. ऑक्टोंबर महिन्यात पहिल्या सोमवारी दिनांक 7 ऑक्टोंबर 2024 रोजी सकाळी 11 वाजता लोकशाही दिनाचा कार्यक्रम जिल्हाधिकारी प्रजित नायर यांचे अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात आयोजित करण्यात आला आहे. 

लोकशाही दिनानिमित्ताने जिल्हाधिकारी यांचेकडून जनतेच्या तक्रारी, अडचणी व गाऱ्हाणी एैकून घेण्यात येतील आणि शासनाच्या विविध विभागाचे जिल्हा स्तरावरील प्रमुख अधिकारी यांना त्या संबंधी कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात येतील. जिल्हाधिकारी कार्यालयात लोकशाही दिनानिमित्य या कार्यक्रमात ज्या नागरीकांनी 15 दिवसापूर्वी अर्ज सादर केलेले आहेत, त्यांनीच लोकशाही दिनात उपस्थित राहून आपल्या तक्रारी, अडचणी व गाऱ्हाणी सादर करावीत. याबाबत सर्व जनतेनी नोंद घ्यावी, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी भैय्यासाहेब बेहेरे यांनी केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या