Hot Posts

6/recent/ticker-posts

प्रोत्साहनपर लाभ योजनेंतर्गत ;आधार प्रमाणीकरणास 30 सप्टेंबर पर्यंत मुदतवाढ


 गोंदिया, दि.24 ; 

     महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना 2019 अंतर्गत प्रोत्साहनपर लाभासाठी पात्र ठरलेल्या (विशिष्ट क्रमांक देण्यात आलेल्या) परंतु आधार प्रमाणीकरण न झालेल्या शेतकऱ्यांसाठी महा-आयटी यांनी 12 ऑगस्ट ते 18 सप्टेबर 2024 पर्यंत आधार प्रमाणीकरणासाठी सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली होती.

   या कालावधीत गोंदिया जिल्ह्यातील 203 शेतकऱ्यांनी आधार प्रमाणीकरण केलेले नाही. तरी सदर शेतकऱ्यांसाठी आधार प्रमाणीकरणाची सुविधा महा-आयटी यांनी 30 सप्टेंबर 2024 पर्यंत वाढविण्यात आलेली आहे. असे जिल्हा उपनिबंधक प्रशांत सोनारकर यांनी कळविले आहे.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या