Hot Posts

6/recent/ticker-posts

देवरी पोलिसांच्या सतर्कतेमुळे 3 लक्ष 23 हजार 440 रुपयांच्या सुगंधीत तंबाखु व मुद्देमाल जप्त

 


देवरी,दि.12 ; 

      दिनांक ११ सप्टेबर २०२४ राेजी २०.०० वा, दराम्यान पोलीस स्टेशन देवरी हद्दीत पेट्रोलिंग करीत असतानां  गोपनिय सुत्रांकडुन देवरी पोलिसांना मिळालेल्या माहीतीनुसार शिरपुर फाट्यावर देवरी पोलिसांतर्फे बंदोबस्त लावन्यात आला. शिरपुर फाटा येथे बंदोबस्त ठिकानी वाहनांची तपासनी  करते वेळी  पांढ-यारंगाची टाटा इंडीगो गाडी क्र. एम.एच ३६,एच २८६५ ही बाघनदी येथुन देवरीकडे येत असतांनी त्या चारचाकी वाहनाला थांबवित तपास करन्यात आला.   

सदरगाडीस थाबवुुन गाडीचा तपास  केला असता सदर चारचाकी वाहनात 

१) होला हक्का - शिशा तंबाखु १६ प्लॉस्टीक बोरीत १००० ग्रेम प्रमाणे एकुण १६० नग सिलबंद पॅँकेट प्रत्येकी ८२०/ रु. प्रमाणे एकुण किमती१, ३१, २०० /रु. २) इगल ०६ प्लॉस्टीक बोरीत ४०० ग्रेम प्रमाणे एकण ६६ नग सिलबंद फॅकेट प्रत्येकी ६४०/रु. प्रमाणे एकुन किंमती ४२,२४० / रु. तसेच टाटा इंडीगो गाडी क्र, एम.एच ३६,एच २८६५ किमती१,५०,०००/रु. असे एकुण ३,२३, ४४০ /रु. चा  मुद्देमाल मिळून आला.

 गाडी चालक आरोपी नामे चंद्रकांत धनंजय डोंगरे वय २० वर्ष रा, कोष्टी मोहल्ला, वार्ड क्र,०१ अडयाळ ता. पवनी,जि. भंडारा यास पोलिसस्टेशन देवरी येथे आणुन माल ताब्यात घेण्यात आला. मालासंबंधाने पुढील कारवाई श्री महेश चहांदे अन्न वऔषध अधिकारी गोंदिया/भंडारा यांना देवरी पोलिस्टेसन तर्फे  पत्रव्यवहार करण्यात आले आहे. 

 सदर कारवाई गोदिया जिल्हापोलीस अधिक्षक श्री गोरख भामरे साहेब, श्री नित्यानंद झा साहेब, अपर पोलीस अधिक्षक गोदिया, कँम्प देवरी, श्री विवेक पाटील साहेब, उपविभागिय पोलीस अधिकारी देवरी, श्री प्रविण डांगे पोलीस निरिक्षक देवरी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक गिता मुळे, पोशि खांडेकर , पांडे ,  पारधी , कमाने  व नेताम यांनी केली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या