Hot Posts

6/recent/ticker-posts

आंबेडकर महाविद्यालयात ‘राष्ट्रीय शैक्षणिक धोरण-2020’ वर कार्यशाळा संपन्न


देवरी,दि.04 ; 

       स्थानिक लोहारा येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय सुरतोली/लोहारा येथे प्रथम वर्षाला प्रवेशित नवोदित विद्यार्थ्यांकरिता ‘राष्ट्रीय शैक्षणिक धोरण’ २०२० (NEP-2020) च्या अनुषंगाने तीन दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आलेले होते. सदर कार्यशाळेचा उद्धेश्य विध्यार्थी, शिक्षक आणि शैक्षणिक कर्मचाऱ्याना या धोरणाच्या महत्वाच्या पैलुंशी परिचित करून देणे हा होता. या कार्यशाळेचे उद्घाटन राजकुमार के. मळामे (संस्था सचिव जनता बहुउद्देशिय संस्था धोबिसराड) यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्ष विक्रांत आर. मळामे (संस्था सदस्य जनता बहुउद्देशिय संस्था धोबिसराड), प्रा. सिमा जवादे ( कार्यकारी प्राचार्या डॉ. बा. आं. महा. सुरतोली) यांच्या उपस्थितीत उद्घाटनीय सोहळा संपन्न झाला. उद्घाटनीय सोहळ्याचे संचालन प्रा. सचिन कोल्हे व आभार प्रा. प्रिया दडमल यांनी केले.

सदर कार्यशाळेमध्ये NEP 2020 च्या विविध पैलूंवर चर्चा करण्यात आली. यामध्ये शिक्षणाच्या नव्या संधी, कौशल्य विकास, बहुआयामी शिक्षण, औद्योगिक विकास संधी, आणि विध्यार्थांचे सर्वांगीण विकास या मुद्यांवर विशेष भर देण्यात आला. कार्यक्रमाला प्रमुख मार्गदर्शक डॉ. अरुण के. झिंगरे (प्राचार्य एम. बी. पटेल महाविद्यालय देवरी) उपस्थित होते. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण- २०२० चा आधार भारतातील प्राचीन विद्यापीठ नालंदा, तक्षशीला येथील शिक्षण प्रणाली असल्याचे त्यांनी सांगितले. नवीन शैक्षणिक धोरण विद्यार्थ्यांकरिता नवी पर्वणी असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

कार्यशाळेच्या दुसऱ्या सत्रात प्राध्यापकांनी NEP 2020 अंतर्गत नवनवीन संधींचा आढावा घेतला. प्राध्यापकांनी विविध पद्धतीचा अवलंब करून विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या नव्या पायऱ्यावर नेण्याचे उद्दिष्ट्य ठेवले. याशिवाय कार्यशाळेत सहभागी विद्यार्थ्यांना NEP 2020 मध्ये दिसणाऱ्या आव्हनांना सामोरे कसे जाता येईल याबाबत चर्चा करण्यात आली. सदर कार्यशाळेमध्ये प्रत्येक विषयाच्या अभ्यासक्रमाबद्दल चर्चा करण्यात आली.

तीन दिवसीय कार्यशाळेचा समारोपीय कार्यक्रम राजकुमार मळामे (संस्था सचिव ज. ब. संस्था धोबिसराड), विक्रांत आर. मळामे (संस्था सदस्य ज. ब. संस्था धोबिसराड), प्रा. सिमा जवादे ( कार्यकारी प्राचार्या डॉ. बा. आं. महा. सुरतोली), प्रा. सुयोग गजभिये (वाणिज्य विभागप्रमुख), प्रा. किशोर मेंढे (कला विभागप्रमुख), प्रा. मनोज हेमने (IQAC समन्वयक), प्रा. प्रभाकर भैसारे, प्रा. तुषार गेडाम  व इतर प्राध्यापकवृंद यांच्या उपस्थितीत पार पडला. कार्यक्रमाच्या यशस्वितेकरिता विलास नंदेश्वर, शुभम डोंगरे, गीता नंदेश्वर, प्रियंका भिमटे, समिर निमजे यांनी सहकार्य केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या