Hot Posts

6/recent/ticker-posts

आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्राचे ; प्रधानमंत्र्यांचे हस्ते ऑनलाईन उद्घाटन आज 20 सप्टेंबरला


गोंदिया, दि.20 ; 

      कौशल्य विकास या संकल्पनेचा अधिकाधिक लाभ राज्यातील युवक-युवतींना व्हावा या दृष्टीकोनातून राज्यामधील नामांकीत महाविद्यालयांमध्ये कौशल्य विकास केंद्र स्थापन करुन महाविद्यालयीन युवक-युवतींना रोजगारक्षम बनविण्यासाठी प्रमोद महाजन कौशल्य व उद्योजकता विकास अभियान योजनेच्या धर्तीवर महाविद्यालयामध्ये आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्राची स्थापना केली जात आहे. जिल्ह्यातील 19 महाविद्यालयामध्ये सुरु केलेल्या ‘आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्राचे’ उद्घाटन आज 20 सप्टेंबर 2024 रोजी प्रधानमंत्री यांच्या हस्ते ऑनलाईन पध्दतीने करण्यात येणार आहे. या केंद्रामधून मोफत प्रशिक्षण दिले जाणार आहे.

 गोंदिया जिल्ह्यातील शासकीय पॉलिटेक्निक गोंदिया, फुंडे सायन्स ज्युनियर कॉलेज फुलचूर, शिवप्रसाद सदानंद जयस्वाल कॉलेज अर्जुनी मोरगाव, एस.चंद्र महिला महाविद्यालय सडक अर्जुनी व आमगाव, जगत आर्टस् कॉमर्स ॲन्ड इंदिराबेन हरिहरभाई पटेल सायन्स कॉलेज गोरेगाव, श्री. दत्त प्रायव्हेट आयटीआय तिरोडा, गणेश हायस्कुल ॲन्ड ज्युनियर कॉलेज गुमाधावडा, जय दुर्गा हायस्कुल ॲन्ड ज्युनियर कॉलेज गौरनगर, जे.एम. हायस्कुल ॲन्ड ज्युनियर कॉलेज गोंदिया, सालेकसा हायस्कुल ॲन्ड ज्युनियर कॉलेज सालेकसा, वीरांगणा राणी अवंतीबाई हायस्कुल ॲन्ड ज्युनियर कॉलेज नाकानिंबा, खुशाल कापसे आर्टस् सायन्स ज्युनियर कॉलेज तांडा/अदासी, स्कॉलर्स  कॉलेज सडक अर्जुनी, निर्मल इन्स्टिट्युट ऑफ पॅरामेडिकल ॲन्ड स्कील डेव्हलपमेंट सेंटर, वीर महाविद्यालय गोरेगाव, राजु भदाडे प्रायव्हेट आयटीआय दांडेगाव, श्रीयांश प्रायव्हेट आयटीआय तिरोडा, एम.जी. पॅरामेडिकल गोंदिया, अशा एकूण 19 महाविद्यालयामध्ये आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्राचे उद्घाटन होणार आहे.

आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्रात जास्तीत जास्त उमेदवारांनी नोंदणी करुन या याजनेचा लाभ घ्यावा. तसेच सदर उद्घाटन कार्यक्रमाला त्या-त्या महाविद्यालयाच्या ठिकाणी जास्तीत जास्त उमेदवारांनी सहभाग घेऊन उद्घाटन सोहळा पार पाडावा, असे आवाहन कौशल्य विकास विभागाचे सहायक आयुक्त रा.ना. माटे यांनी केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या