Hot Posts

6/recent/ticker-posts

2 बैल ठार तर 3 चालक जखमी ; 3 बैलगाड्यांना ट्रकची धडक



गोंदिया, दि.18 ;

      सडक अर्जुनी तालुक्यातील कोहमारा तेनवेगाव-बांध मार्गावर कनेरी गाव शिवारात सोमवार (दि. १६) सायंकाळच्या सुमारास एका भरधाव ट्रकने एकापाठोपाठ एक तीन बैलगाड्यांना जोरदार धडक दिल्याने दोन बैल जागीच ठार झाले. तर चार बैल व तीन बैलगाड़ी चालक गंभीर जखमी झाल्याची घटना घडली. भूपेंद् दोनोडे (वय ३), हेतराम मेंढ़े (वय ४१), इुडेश्वर हैमणे(वय २५, तिघेही रा. राका, ता. सड़क, अर्जुनी) असे जखमी बैलगाडी चालकांचे नाव आहे.

भूपेंद्र व त्याचे सहकारी घरगुती कामासाठी बैलगाडीने नदीतून वाळूउपसा करून एका मागे एक या प्रमाणे कोहमारा ते नवेगाव- बांधमुख्य मार्गाने राका येथे जात असताना कनेरी गावाजवळ कोहमाराकडून भरधाव वेगात येत असलेल्या ट्रक क्र.  (सी.जी.०८ए.एक्स.३२२२)  च्या  चालकाचा टूरकवरील ताबा सुटल्याने, ट्रकने   तिन्ही बैलगाड्यांना मागेहून जबर धडक दिली . यात दोन बैलजागीच ठार झाले. तर उर्वरीत रित बैल व बैलगाडी चालक गंभीररित्या जखमी झाले.

धडक इतकी जोरदार होती की, तिन्ही बैलगाड्या रस्त्याच्या कडेवर दूरवर फेकल्या गेल्या. यात बैलगाड्यांची मोडतोड होऊन नुकसान झाले.यावेळी प्रत्यक्षदर्शीनी गंभीर जखमी बैलगाडी चालकांना उपचाराकरिता प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. व घटनेची माहिती डुग्गीपार पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून ट्रक चालकावर गुन्हा नोंद केला आहे. पुढील तपास पोलीस हवालदार गुणवंत कठाने करीत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या